इस्रायलकडून गाझात नव्याने लष्करी कारवाई सुरू   

जेरुसलेम : हमासवर उर्वरित ओलिसांच्या सुटकेसाठी दबाव आणण्यासाठी  इस्रायलने गाझा पट्टीत मोठी लष्करी कारवाई सुरू केली आहे, असे इस्रायलचे संरक्षणमंत्री काट्झ यांनी सांगितले. 
  
काट्झ म्हणाले, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आठवड्याच्या सुरुवातीला हमासवर दबाव वाढवण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी जवळजवळ दोन दशकांपासून गाझावर राज्य करणार्‍या दहशतवादी गटाचा नाश केला आहे. आता इस्रायलच्या सैन्याकडून ऑपरेशन गिडियन चॅरियट्सचे नेतृत्व मोठ्या ताकदीने केले जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलला भेट न देता या प्रदेशाचा दौरा संपवला. तेव्हा ही कारवाई करण्यात आली. यामध्ये आतापर्यंत १५० पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ट्रम्प यांच्या दौर्‍यामुळे संघर्षबंदी कराराची शक्यता वाढेल किंवा गाझाला मानवतावादी मदत पुन्हा सुरू होईल, अशी व्यापक आशा होती. मात्र, तसे झाले नाही. 
 
गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या २४ तासांत इस्रायली हल्ल्यांमध्ये १५० हून अधिक लोक मारले गेले आहेत. १८ मार्च रोजी इस्रायलने जानेवारीत संघर्षबंदी तोडल्यापासून जवळजवळ ३ हजार लोक मारले गेले आहेत. गाझामध्ये असलेल्या ओलिसांपैकी २३ जण अजूनही जिवंत आहेत, असा विश्वास इस्रायलला आहे.  ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासच्या नेतृत्वाखालील दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायलवर हल्ला केला, तेव्हा हे युद्ध सुरू झाले, ज्यामध्ये १ हजार २०० लोक मारले गेले आणि २५१ जणांचे अपहरण केले गेले. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इस्रायलच्या प्रत्युत्तरात्मक हल्ल्यात आतापर्यंत ५३ हजारहून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. 

Related Articles